ग्वाल्हेर :वृत्तसंस्था – PM Modi |येथील एका ब्राम्हण कुटुंबाने शेजाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून धर्मपरिवर्तन करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडे केली आहे. या कुटुंबाने पंतप्रधानांना (PM Modi) पत्र लिहिले असून इस्लाम स्वीकारणार असल्याचे म्हंटले आहे. केवळ पंतप्रधानच नाही तर या कुटूंबाच्या प्रमुखाने अनेक अधिकाऱ्यांनाही पत्रे लिहिली आहेत. आणि ही सर्व पत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
२५ सदस्य असणारे हे कुटुंब ग्वाल्हेरमधील (Gwalior) अपागंज परिसरात राहत आहे. काही दिवसांपासून शेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबामुळे हे कुटुंब त्रस्त झाले असून शेजारी राहणारे एससी, एसटी कायद्यामध्ये अडकवण्याची धमकी देत आहेत, असा आरोप या कुटुंबाने केला आहे. त्यामुळे यामध्ये आपल्याला मुस्लिम समाज (Muslim society) मदत करेल असा विश्वास वाटत असल्याने आपल्या कुटूंबाला धर्मपरिवर्तन करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शर्मा नावाचे २५ जणांचे कुटुंब पूजा विहार कॉलनी(Pooja Vihar Colony)त राहते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या उमरैया कुटुंबाने (Umraiya family) त्यांचे जगणे मुश्किल केले आहे. हे कुटुंब आपल्याशी सातत्याने वाद घातले. शिविगाळ करते तसेच एससी-एसटी कायद्यांतर्गत खोटी तक्रार करण्याची धमकीही देऊन त्रास देते.
आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य भीतीच्या छायेत वावरतात, पोलिसांमध्ये तक्रार केली तरी सुनावणी
होत नाही, असा आरोप या कुटुंबातील प्रमुखांनी केला. दरम्यान, ९ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे
या कुटूंबाने याबाबत तक्रार पत्राद्वारे केली आहे. हिंदू धर्माचा त्याग करून इस्लामचा स्वीकार
करण्याचा इशाराही या पत्रात दिला. ग्वाल्हेरचे डीएम कौशलेंद्र विक्रम सिंह, एसपी अमित सांघी(Gwalior DM Kaushalendra Vikram Singh, SP Amit Sanghi)
यांनाही हे पत्र या कुटुंबाने दिले आहे. सोशल मीडियावर (Social Media) हे पत्र व्हायरल होताच सर्वत्र खळबळ
उडाली आहे. पोलिसांनी पीडित कुटुंबाला बोलावून त्यांच्याशी चर्चा केली तसेच चौकशी केल्यानंतरच
खातरजमा करूनच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आश्वासन या कुटूंबाला दिले आहे. दोन्ही कुटूंबाला बोलावून पोलिसांनी समज दिली आहे.
web title: PM Modi | Brahmin family writes letter to PM Modi urging him to accept Islam.
मुलाला शाळेत आठवले ’बसपन’चे प्रेम; 90 लाख लोकांनी पाहिला ‘जानेमन’ची आठवण काढणार्या मुलाचा Video
Pimpri Crime | सेट्रींगचे काम करताना चौथ्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यु
CM Uddhav Thackeray | काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवरून मुख्यमंत्री ठाकरेंनी लगावला टोला; म्हणाले…