मुंबई न्यूज (Mumbai News) : बहुजननामा ऑनलाइन – Ganesh Utsav-2021 |संपूर्ण महाराष्ट्राचे (Maharashtra) लाडके दैवत असलेल्या गणपतीच्या आगमनाची (Ganesh Utsav -2021) सर्वांनाच उत्सुकता असते. यंदाचा गणेशोत्सव (Ganesh Utsav -2021) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे (Guidelines for Ganesh Utsav -2021) जाहीर केली आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी (Ganesha idol) 4 फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी 2 फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. परंतु गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नको अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे काय पडसाद उमटतात हे पहावे लागेल.
(State Government Guidelines for Ganesh Utsav -2021)
देशासह राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020 मध्ये गणेशोत्सवासह इतर सर्व सण साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत.
यंदाही गणेशोत्सवावर (Ganesh Utsav -2021) कोरोनाचे (Corona) सावट आहे.
त्यामुळे या वर्षीचा गणेशोत्सव (Ganesh Utsav) साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
त्यापार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मार्गदर्शक सूचना (Guidelines for Ganesh Utsav) जाहीर केल्या आहेत.
गृहविभागाच्या गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना (Home Ministry’s guidelines for celebrating Ganapathi Festival socially)
1. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी (Ganeshotsav Mandals) महापालिका, स्थानिक प्रशासन (Municipal Corporation, Local Administration) यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी (permission) घेणे आवश्यक आहे.
2. कोविड-19 (Covid-19) मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका (Municipal Corporation) तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे (Pandals) धोरण त्यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत.
या वर्षीचा गणेशोत्सव (Ganesh Utsav -2021) साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
3. श्रीगणेशाची मूर्ती (Shriganesha idol) सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती गणपती करिता 2 फुटांच्या मर्यादेत असावी.
4. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्ती (Traditional Ganesha idols) ऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे.
मुर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन (Immersion) शक्यतो घरच्या घरी करावे.
विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन (Artificial immersion) स्थळी विसर्जन करावे.
5. उत्सवा करिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा.
जाहिरातींच्या (Advertising) प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची काळजी घ्यावी.
तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश (Health and social messages) असलेल्या जाहिराती प्रदर्शित (Ads displayed) कराव्यात.
6. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी (Cultural events) आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे.
त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू (Corona, malaria, dengue) इत्यादी आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.
7. लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
8. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम (Religious program) आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भात (Noise pollution) नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे.
9. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन (Online), केबल नेटवर्क (cable network), वेबसाईट (website) व फेसबुक (Facebook) इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी.
10. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची (thermal screening) पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंग) Physical distance तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
11. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूक (Immersion procession) काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या (ganpati visarjan miravnuk) पारंपारिक पद्धतीने विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.
लहान मुले व वरिष्ठ नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे.
संपूर्ण चाळीतील, इमारतीमधील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढू नये.
12. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जन करिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
13. कोविड -19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य,
पर्यावरण, वैद्यकीय, शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक आहे.
Web Title : Ganesh-utsav-2021 | Thackeray government announces guidelines for Ganesh Utsav – 2021, know the complete rules
Supreme Court | 31 जुलैपर्यंत वन नेशन, वन रेशनकार्ड योजना लागू करा; SC चे राज्यांना आदेश
Khadki Police | मध्यरात्री खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरूणाच्या खुनाचा प्रयत्न
…म्हणून इस्रायलच्या दूतावासानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं केलं मराठीतून अभिनंदन
Pune Ambil Odha Slum | ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी पुण्यातील आंबिलओढा झोपडपट्टीवासियांची घेतली भेट