नवी दिल्ली : वृत्त संस्था – Supreme Court | देशातील कोरोना संकटाच्या (Corona Crisis) पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 29) वन नेशन, वन रेशनकार्ड (One Nation One Ration Card ) योजनेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टानं देशातील सर्व राज्यांना 31 जुलैपर्यंत वन नेशन, वन रेशनकार्ड योजना (One Nation One Ration Card Scheme)
लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) न्यायाधीश अशोक भूषण (Judge Ashok Bhushan) यांच्या खंडपीठाने याबाबतचा आदेश दिला आहे.
वन नेशन, वन रेशनकार्ड (One Nation One Ration Card ) या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सुप्रिम कोर्टाने 31 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. जेणेकरुन प्रवासी मजुरांना देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात या योजनेचा लाभ घेता येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. कोरोनामुळे स्थलांतरीत कामगारांच्या सोयी-सुविधांसंदर्भात संबंधित राज्य सरकारांना यावेळी सुप्रीम कोर्टाने उत्तम नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. प्रवासी मजुरांना अन्नधान्य उपलब्ध करुन देण आणि त्याच्यासाठी कम्युनिटी किचन’ यापुढील काळातही सुरु ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
web title :Supreme Court | Implement One Nation, One Ration Card Scheme till July 31; SC orders to the states
Khadki Police | मध्यरात्री खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरूणाच्या खुनाचा प्रयत्न
…म्हणून इस्रायलच्या दूतावासानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं केलं मराठीतून अभिनंदन
Pune Ambil Odha Slum | ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी पुण्यातील आंबिलओढा झोपडपट्टीवासियांची घेतली भेट