पुणे न्यूज (Pune News) :बहुजननामा ऑनलाइन – Khadki Police | मध्यरात्री भररस्त्यावरून हातात पालघन घेऊन तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर खून करण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) करत टोळक्याने दहशत माजवून राडा घातल्याची घटना घडली आहे. बोपोडी (Bopodi Area) भागात हा प्रकार घडला असून, यामुळे या भागात एकच गोंधळ उडाला होता. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात (khadki police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून खडकी पोलिस (khadki police) अधिक तपास करीत आहेत.
याप्रकरणी अभिषेक मोरे (वय 30, रा. बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (khadki police station) तक्रार दिली आहे.
त्यानुसार 8 ते 10 जणांच्या टोळक्यावर खुनाच्या प्रयत्नासह (Attempt to Murder) इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडकी पोलिसांनी (khadki police) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दोन दिवसांपूर्वी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून भाऊ पाटील रोडने स्वाग हॉटेलकडून जात होते.
यावेळी एकाने कट मारला अन त्यालाच शिवीगाळ केली.
त्यानंतर तुला नीट गाडी चालवत येत नाही का,
थांब तुला दाखवतो, असे म्हणत निघून गेला.
यानंतर फिर्यादी देखील निघून गेले व घराजवळ मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते.
त्याचवेळी तो दुचाकी चालक परत रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास 8 ते 10 जणांचे टोळके घेऊन आखील गणेशनगर गोल्डन चौक या ठिकाणी आला.
त्याने फिर्यादी तरुणावर पालघनने वार केला.
मात्र तो फिर्यादी यांनी चुकवला आणि येथून पळ।काढला. यावेळी टोळके देखील हातात पालघन हातात घेऊन रस्त्याने त्याच्या पाठीमागे धावले.
त्याला गाठून त्याच्या डोक्यात वार केले. तसेच, इतर मुलांनी लाकडी दंडक्याने मारहाण केली.
तर परिसरात गोंधळ घालत हवेत कोयता फिरवून दहशत माजवली आहे.
अधिक तपास खडकी पोलीस (khadki police) करत आहेत.
Web Title : Khadki Police Station News | attempt to murder of youth in Khadki Police station area
Pune Ambil Odha Slum | ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी पुण्यातील आंबिलओढा झोपडपट्टीवासियांची घेतली भेट
Mansukh Hiren Death Case । मनसुख हिरन यांच्या हत्येनंतर आरोपींचे पर्यटन, NIA चा खुलासा