पुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन – खडकी (Khadki) येथील लष्कराच्या दारुगोळा फॅक्टरीचा (Khadki Ammunition Factory) भाग असलेल्या बोट क्लब येथून आणखी 7 चंदनाची झाडे (sandalwood tree) चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्याच आठवड्यात खडकी दारूगोळा फॅक्टरी (Khadki Ammunition Factory) परिसरातून 8 झाडे चोरल्याचे समोर आले होते. Theft of 7 sandalwood trees from Boat Club Road which is part of Khadki Ammunition Factory
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी पुरुषोत्तम कुमार (वय 58, रा. रेंजहिल) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार (khadki police station) दिली आहे.
त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार शनिवारी (दि. 19) मध्यरात्री घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दारूगोळा फॅक्टरीत ज्युनिअर वर्कर मॅनेजर आहेत.
खडकी भागात लष्कराची दारूगोळा फॅक्टरी आहे.
लष्कराचा येथे मोठा परिसर आहे. काही ठिकाणी जंगल आहे. तर काही भागात काम चालते.
पण येथील सुरक्षा कडेकोट असते.
दरम्यान शनिवारी मध्यरात्री अज्ञातांनी बोट क्लब परिसरात शिरून येथील 8 चंदनाची झाडे चोरून नेल्याचा प्रकार घडला.
रविवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर फिर्यादी यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी खडकी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान यापूर्वी गेल्याच आठवड्यात फॅक्टरीच्या मॅगझिन परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी आहे. त्याठिकाणी असलेली आठ चंदनाची झाडे (sandalwood tree)चोरून नेली. या याबाबत केशव पतंगे (वय 59) यांनी फिर्याद दिली आहे.
हा प्रकार देखील शनिवारी (दि 19 जून) मध्यरात्री ही घटना घडली आहे.
या दोन्ही गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांकडून (Pune Police) सुरू आहे.
मात्र अद्याप यात काही हाती लागलेले नाही.
Web Title : Khadki Ammunition Factory News | Theft of 7 sandalwood trees from Boat Club Road which is part of Khadki Ammunition Factory
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Actor Ujjwal |अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा