मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Samsung चा नुकताच एक फोन चर्चेत आला आहे. या फोनने बाजारात येताच धुमाकूळ घातल्याचे दिसत आहे. कारण हा फोन प्री-बुकिंगला सुरुवात होताच अवघ्या अर्ध्या तासात एक हजार सहाशे फोनची विक्री होऊन हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला आहे. samsung च्या या फोल्डेबल स्मार्ट फोनची प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना २० ऑक्टोबरपर्यंत फोन मिळणार आहे. या स्मार्ट फोनची किंमत तब्बल एक लाख ६५ हजार इतकी आहे.
या फोनसाठी ग्राहकांनी अतिशय भरघोस प्रतिसाद दिला आहे. अवघ्या काही ३० मिनिटांमध्ये १६०० फोनची विक्री झाली. सॅमसंग कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे प्री-बुकिंग शुक्रवारी ११ ऑक्टोबर रोजी उपलब्ध करण्यात आली होती. चार ऑक्टोबर रोजी कंपनीने स्मार्टफोन पहिल्यांदा प्री-बुकिंगसाठी उपलब्ध केला होता.
फीचर्स –
बॅटरी – ४,३८० mAh क्षमतेची बॅटरी
ऑपरेटिंग सिस्टिम – One UI (अँड्रॉइड ९)
रॅम – १२ जीबी रॅम / ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज
रिअर कॅमेरा – ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप (१६, १२ आणि १२ मेगापिक्सल क्षमता)
फ्रंट कॅमेरा – १० मेगापिक्सल + ८ मेगापिक्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप
पहिला डिस्प्ले – ४. ६ इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले (८४०×१९६० पिक्सल रिझोल्यूशन, आस्पेक्ट रेशियो २१:९)
दुसरा डिस्प्ले – ७.३ इंचाचा इनफिनिटी फ्लेक्स डायनॅमिक AMOLED पॅनल डिस्प्ले.
Visit : bahujannama.com