नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण दहावी उत्तीर्ण असाल तर सरकारी नोकरी तुमची वाट पहात आहे. ही संधी ईशान्य सीमेवरील रेल्वे देत आहे. एनएफआरने भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे. इथे नोकरी मिळवायची असेल तर लवकरच अर्ज करा.
पदाचे नाव – एक्ट अपरेंटिस (Act Apprentice)
पदांची संख्या – २५९०
महत्वाची तारीख –
अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर आहे.
वय मर्यादा:
या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १५ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे निश्चित केले गेले आहे.
शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त मंडळाकडून एकूण ५०% गुणांसह दहावी किंवा त्या समकक्ष (१० + २ परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया:
दिलेल्या कालावधीत पूर्ण केलेला अर्ज मान्य असेल. अर्ज करण्यापूर्वी, कृपया दिलेली सूचना वाचा. सर्व माहितीविषयी जागरूक व्हा आणि ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा.
निवड प्रक्रिया:
गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
Visit : bahujannama.com