नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या SBI बॅंकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. SBI ने आपल्या कामाच्या वेळेत बदल केले आहेत. यापूर्वी SBI ब्राँच सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होत्या. आता या वेळेत आणखी दोन तास वाढवले आहेत. म्हणजेच आता बँक संध्याकाळी 4 वाजेपर्यत सुरु राहणार आहे. काल मंगळवार (दि. 1) पासून हा नियम लागू केला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता 10 ते 4 या वेळेत बॅकेसंबधीची कामे करता येणार आहेत.
Now, as per SLBC instructions, our branch is functioning to render customer services from 10 a.m. to 4.00 p.m. w.e.f. 01.06.2021
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 1, 2021
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेने कामाची वेळ कमी केली होती. परंतु आता कोरोनाची संख्या घटत असल्याने कामाची वेळ 2 तासांनी वाढवली आहे. SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याची माहिती दिली आहे. 1 जूनपासून सर्व एसबीआय ब्राँच 10 ते 4 सुरु राहतील असे ट्विटद्वारे सांगितले आहे. तसेच SBI ने आपल्या ग्राहकांसाठी नवे नोटिफिकेशन जारी केले आहे. यात पैसे काढण्याच्या नियमांबाबत सांगितले आहे. या नव्या नोटिफिकेशननुसार, बँकेकडून आता होम ब्राँच नसलेल्या इतर ब्राँचमधून रोख पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. ग्राहकांना Non-Home ब्राँचमधून 25000 रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. चेकद्वारे Non-Home ब्राँचमधून कॅश काढण्याची मर्यादा 1 लाखांपर्यंत आहे. तसेच थर्ड पार्टी अर्थात ज्याला चेक दिला आहे, त्यांच्यासाठी कॅश काढण्याची मर्यादा वाढवून 50 हजार रुपये इतकी केली आहे. हा नियम 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू होणार आहे.
कोविडमुळे होत आहे डायबिटीज, मुलांमध्ये सुद्धा हा धोका आला समोर
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन ! पतीची गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना
तरुणाचा गळादाबून आणि डोक्यात वार करून खून ! मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला; सिंहगड रोड परिसरातील घटना