नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड (Aadhaar Card) सध्या अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट आहे. परंतु अनेकजण आधार कार्डवरील (Aadhaar Card) फोटोवर समाधानी नसतात. या खराब फोटोमुळे अनेकदा थट्टा सुद्धा केली जाते. तुम्हाला सुद्धा हा फोटो पसंत नसेल तर तो आता सहजपणे बदलू शकता. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएआय) आधार कार्डधारकांना Aadhaar Card आधारवरील आपला फोटो अपडेट करण्याची परवानगी दिली आहे. आधारवर चांगला फोटो लावण्याची सोपी पद्धत आम्ही सांगणार आहोत. जवळच्या नामांकन केंद्रावर जाऊन हे करू शकता. जाणून घेवूयात काय आहे प्रोसेस…
आधार कार्डचा फोटो बदलण्याची ही आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस
स्टेप 1. सर्वप्रथम यूआयडीएआयची वेबसाइट uidai.gov.in वर लॉग इन करा आणि आधार नावनोंदणी फॉर्म डाऊनलोड करा.
स्टेप 2. हा आधार नावनोंदणी फॉर्म भरून जवळच्या आधार नावनोंदणी केंद्रावर जमा करा.
स्टेप 3. आता आधार नावनोंदणी केंद्रावर कर्मचारी तुमचे बायोमेट्रिक डिटेल घेईल.
स्टेप 4. आता आधार नावनोंदणी केंद्राचा कर्मचारी तुमचा फोटो घेईल.
स्टेप 5. आता आधार नामांकन केंद्राचा कर्मचारी शुल्क म्हणून 25 रुपये+जीएसटी घेऊन तुमच्या आधार कार्डवरील फोटो अपडेट करेल.
स्टेप 6. आधार नावनोंदणी केंद्राचा कर्मचारी तुम्हाला यूआरएनसह एक स्लिप सुद्धा देईल.
स्टेप 7. तुम्ही या यूआरएनचा उपयोग करून हे चेक करू शकता की तुमचा आधार कार्डचा फोटो अपडेट झाला आहे किंवा नाही.
स्टेप 8. आधार कार्ड फोटो अपडेट झाल्यानंतर, नवीन फोटोसह एक अपडेटेड आधार कार्ड युआयडीएआयच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येऊ शकते.
कोविडमुळे होत आहे डायबिटीज, मुलांमध्ये सुद्धा हा धोका आला समोर
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन ! पतीची गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना
तरुणाचा गळादाबून आणि डोक्यात वार करून खून ! मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला; सिंहगड रोड परिसरातील घटना