पुणे : बहुजननामा ऑनलाईन – तरुणाचा गळादाबून आणि डोक्यात वारकरून खून (Murder) करत मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. अद्याप हल्लेखोरांची व या खुनाची (Murder) माहिती समोर आलेली नाही. सिंहगड रोड परिसरातत ही घटना घडली आहे.
कृष्णकुमार गुरुचरन प्रसाद (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णकुमार हा सेन्ट्रीगचे कामे करत होता. तो राहण्यास सिंहगड परिसरात होता. त्याचा विवाह झालेला नाही. पण, तो लिव्हइनमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी (31 मे) नऱ्हे येथील अभिनव कॉलेजजवळ शिवनेरी बी. नवीन बांधकाम साईड सुरू आहे. येथील पाण्याच्या टाकीत मृतदेह असल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यांनी याबाबत सिंहगड रोड पोलीस यांना कॉलकरून माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला. त्यात डॉक्टरांनी डोक्याला मार आणि गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खुनाचे कारण आणि हल्लेखोर याबाबत माहिती घेतली जात असून, लवकरच गुन्हा उघड होईल, असे पोलीस निरीक्षक घेवारे यांनी सांगितले.
डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून
कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या
6 कोटी नोकरदारांना मोदी सरकारची मोठी भेट ! पुढील महिन्यात PF खात्यात येतील जास्त पैसे, जाणून घ्या
DIG मनु महाराज यांचे ‘फेक’ फेसबूक प्रोफाइल बनवून मुलींशी अश्लील चॅटिंग, झाली अटक
आज मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन, 5 राशींना अडचणी, रहा सावध; इतरांसाठी असा आहे बुधवार