नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला बिझनेस सुुरू कराचा आहे का…एक्स्ट्रा कमाई करण्याचा प्लॅन करत आहात का? आज आम्ही एक अशी बिझनेस आयडिया देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दर महिन्याला बंपर पैसे मिळवू शकता. भारतात एक मोठी लोकसंख्या चहाची शौकीन आहे. रेल्वे स्टेशन, बस डेपो आणि विमानतळावर कुल्हडच्या चहाची मागणी सतत वाढते आहे. अशावेळी तुम्ही कुल्हड बनवण्याचा आणि विकण्याचा बिझनेस सुरू करू शकता. या बिझनेस बाबत जाणून घेवूयात…
मोदी सरकारने कुल्हड बिझनेस वाढवण्यासाठी कुंभार सशक्तीकरण योजना लागू केली आहे. या अंतर्गत कुंभारांना वीजेवर चालणारे चाक दिले जाते. नंतर तयार कुल्हड खरेदी सुद्धा केले जातात.
5 हजार गुंतवून सुरू करा बिझनेस
हा बिझनेस अतिशय कमी खर्चात सुरूहोऊ शकतो. यासाठी थोडी जागा आणि 5,000 रुपयांची आवश्यकता आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाचे चेयरमन विनय कुमार सक्सेना यांनी माहिती दिली की, यावर्षी सरकारने 25 हजार इलेक्ट्रिक चाकांचे वितरण केले.
किती रुपयात विकू शकता कुल्हड?
चहाच्या कुल्हडचा भाव सुमारे 50 रुपये शेकडा आहे. अशाच प्रकारच्या लस्सी कुल्हडची किंमत 150 रुपये शेकडा आणि प्याली 100 रुपये शेकडा आहे. मागणी वाढल्यास यापेक्षा चांगला भाव मिळू शकतो.
होईल चांगली बचत
सध्या शहरांमध्ये कुल्हड चहाची किंमत 15 ते 20 रुपयांपर्यंत सुद्धा असते. जर बिझनेस योग्यप्रकारे चालवला आणि कुल्हड विकण्याकडे लक्ष दिले तर 1 दिवसात 1,000 रुपयांची बचत केली जाऊ शकते.
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन ! पतीची गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना
तरुणाचा गळादाबून आणि डोक्यात वार करून खून ! मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला; सिंहगड रोड परिसरातील घटना
डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून
कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या
6 कोटी नोकरदारांना मोदी सरकारची मोठी भेट ! पुढील महिन्यात PF खात्यात येतील जास्त पैसे, जाणून घ्या