नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून सध्या घरातच विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे जनसंपर्क प्रमुख प्रथेश पटेल यांनी ही माहिती दिली आहे. शंकरसिंह वाघेला यांना गेल्या तीन दिवसांपासून ताप येत होता. ज्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली. जी पॉझिटिव्ह आली आहे.
यानंतर त्यांना त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी गृह विलिगीकरणात ठेवण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून वाघेला यांना ताप येत आहे. त्यांनी कोरोना रुग्ण असलेल्या अनेक रुग्णालयांना भेट दिली होती. त्यातून कदाचित त्यांना लागण झाली असावी असेही पटेल यांनी म्हटले आहे. कोरोना रुग्ण असलेली रुग्णालये आणि कोविड केअर सेंटर्स या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. कदाचित त्यामुळेच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे.