बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रात पुढील सरकार स्थापन करण्यासाठी व अनेक दिवसांपासून लांबणीवर असलेला सत्ता स्थापनेचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे या नवीन सरकार स्थापनेत नक्की कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्रि होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. सध्या सत्तावाटपावर चर्चा सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे मंत्रिमंडळातील नेत्याची यादी घेऊन दाखल झाले आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसने देखील आपली मंत्रिपदासाठीची नावे तयार केल्याची माहिती मिळाली आहे.
या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांना मंत्रिपदे मिळणार यांच्या नावाची यादी समोर आली आहे. या संभाव्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या पक्षातील दिग्गज आणि अनुभवी नेत्यांवर धूर दिल्याचे बोलले जात आहे. आघाडीत अनेक नेते नव्या मंत्रिमंडळात दिसणार असल्याची शक्यता आहे.
ही आहेत काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची नावे –
बाळासाहेब थोरात
अशोक चव्हाण
विश्वजीत कदम
सतेज बंटी पाटील
सुनिल केदार
पृथ्वीराज चव्हाण
विजय वडेट्टीवार
यशोमती ठाकूर
के सी पाडवी
ही आहेत काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्याची नावे –
अजित पवार
छगन भुजबळ
राजेश टोपे
दिलीप वळसे पाटील
मकरंद पाटील
जयंत पाटील
नवाब मलिक
हसन मुश्रीफ
अनिल देशमुख
धनंजय मुंडे
या नेत्यासोबत अजून काही नेत्यांना राष्ट्रवादीकडून मंत्रिपदाची संधी मिळू शकते. राष्ट्रवादीसोबत कॉंग्रेसचे देखील मंत्रिमंडळात १५ मंत्री असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही नेत्यांच्या नावावर चर्चा असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्रिपद दोघात की शिवसेनेत
राज्यात निकाल लागताच कळाले की कोणत्या पक्षाला बहुमताचा आकडा पार करता आला नाही. त्यामुळे महाशिवआघाडीची गणिते आता जुळताना दिसत असली तरी हे स्पष्ट आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागांमध्ये जास्त फरक नाही. त्यामुळे ५०-५० फॉर्मुल्यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पहिले मुख्यमंत्रिपद शिवसेनेला मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे आणि दुसरे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला जाईल. या दोघांमध्ये अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदासाठी मागणी होऊ शकते.
Visit : bahujannama.com