नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी निर्वाह निधी संघटना प्रॉव्हिडंट फंडावर व्याजदर कमी करण्याचा विचार करत असून ईपीएफओ आर्थिक वर २०२० साठी पीएफ डिपॉजिट व्याजदर १५ बेसिस पॉईंट्स म्हणजे ०.१५ टक्के कमी केली आहे. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये व्याजदर ८.६५ टक्के होते. नोकरदारांसाठी पीएफ भविष्याच्या सुरक्षेसाठी असून व्याजदर कमी झाले तर त्याचा परिणाम पीएफवर होईल. ५ मार्चला होणाऱ्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टच्या मीटिंगमध्ये ईपीएफओबद्दल निर्णय घेण्याबाबत चर्चा केली जाईल.
एका वृत्तसंस्थेनुसार लॉंग टर्म फिक्सड डिपॉजिट बॉंड्स आणि सरकारी सिक्युरिटीजपासून ईपीएफओची कमाई मागच्या वर्षीच्या तुलनेत ५०-८० बेसिस पॉईंट्स खाली आली आहे. अशात ईपीएफओसाठी या वर्षात व्याजदर जसेच्या तसे ठेवणे अवघड आहे.
या दोन कंपन्यांमध्ये ईपीएफओचे फसले ४,५०० कोटी रुपये
ईपीएफओने दोन बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांमध्ये सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून यात DHFL आणि IL&FS यांचा समावेश आहे. या दोन्ही कंपन्या दिवाळखोरीच्या ठरावाच्या प्रक्रियेतून जात असल्याने पैसे ताबडतोब परत मिळवणे कठीण आहे.
एकूण १८ लाख कोटी रु.ची गुंतवणूक
ईपीएफओने १८ लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली असून त्यापैकी ८५ टक्के कर्ज मार्केटमध्ये तर १५ टक्के ईटीएफद्वारे इक्विटीमध्ये केले जाते. मार्च २०१९च्या अखेर ईपीएफओची इक्विटीमध्ये एकूण गुंतवणूक ७४,३२४ कोटी रुपये होती आणि ती १४.७४% परत आली.