नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून राज्यात 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र, हरियाणा, विधानसभा निवडणुकांची आज घोषणा झाली असून 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तसेच 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे तर दिवाळीपूर्वी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होणार आहे.
महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी 1.8 लाख इव्हिएमचा वापर होणार आहे. राज्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आजपासून महाराष्ट्र आणि हरियाणात आचारंसहिता लागू करण्यात आली आहे.
CEC: By-elections to 64 constituencies across Arunachal Pradesh, Bihar, Chhattisgarh, Assam, Gujarat, Himachal Pradesh, Karnataka, Kerala, MP, Meghalaya, Odisha, Puducherry, Punjab, Rajasthan, Sikkim, Tamil Nadu, Telangana &Uttar Pradesh, to be held on Oct 21 ;counting on Oct 24 pic.twitter.com/qs1EXsEVbV
— ANI (@ANI) September 21, 2019
Visit : bahujannama.com