बहुजननामा ऑनलाईन टीम – फ्रान्सने भारतीय हवाई दलाकडे पहिले राफेल लढाऊ विमान सोपविला आहे. विमानात सुमारे एक तासभर हवाई दलाचे उप – प्रमुख एअर मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी उड्डाण केले. गुरुवारी फ्रान्सने पहिले राफेल विमान भारताला दिल्याची माहिती भारतीय हवाई दलाच्या सुत्रांकडून मिळाली आहे. या राफेल विमानाचा टेल क्रमांक RB-01 असा आहे, जे भारतीय वायुसेनेचे भावी मुख्य एअर मार्शल राकेश कुमारसिंग भदौरिया यांचे नाव दर्शवत आहे.
याआधीही भदौरिया यांनी राफेल फायटर जेट उडवले आहे. राफेल उडवणारे भारतीय वायू सेनेतील ते पहिले एअर चीफ मार्शल आहेत. त्यांना वायुसेनेचे मुख्य अधिकारी म्हणून गुरुवारी नियुक्त करण्यात आले. ते एअर चीफ मार्शल बीएस धनोआ यांची जागा घेणार आहेत. ३० सप्टेंबर रोजी धनोआ आपल्या पदावरून निवृत्त होणार आहेत. एअर मार्शल भदौरिया हे २६ प्रकारचे फायटर आणि ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट उडवण्यात पारंगत आहते. तसेच त्यांना ४२५० तास फायटर विमान उडवण्याचा अनुभव आहे.
राफेक मुद्दा लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेत होता
राफेल फायटरचा मुद्दा गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस खूप चर्चेचा विषय बनला होता. राफेल विमान खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर केला होता. यावेळी राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधत जोरदार आक्रमण केले होते. राफेल बाबतची तयारी भारतात वायुसेनेकडून करण्यात येत आहे. वायुसेना आपल्या ‘गोल्डन ऐरोज’ १७ पुन्हा सुरु करण्याच्या तयारीत आहे. ही राफेल विमान उडवणारी पहिली तुकडी आहे.
Visit : bahujannama.com