मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील mumbai नालेसफाईच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यांनी आज मुंबईतील mumbai नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी आशिष शेलार यांनी सचिन वाझेवर आरोप केले. “नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदाराकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी सचिन वाझेवर होती, त्यामुळे वाझे आणि नालेसफाईच्या कामातील कनेक्शनची चौकशी झाली पाहिजे.” अशी भूमिका आशिष शेलार यांनी यावेळी घेतली.
नालेसफाईच्या पाहणीनंतर बोलताना आशिष शेलार म्हणाले,
“सचिन वाझेला महापालिकेच्या कंत्राटदारांकडून वसुली करण्यास सांगण्यात आले होते.
तशी माहिती न्यायालयाच्या रेकॉर्डवर आलेली आहे.
त्यामुळे नालेसफाईच्या कामाची आणि वाझेची चौकशी करण्यात यावी.
तसेच मुंबई महापालिकेची मान्सूनपूर्व तयारी पूर्णपणे झालेली नाही.
नालेसफाईचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचा महापालिकेचा दावा खोटा आहे.
नालेसफाई करून दाखवण्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेला या जबाबदारीतून हात झटकता येणार नाही.
७० कोटी रुपये नालेसफाईसाठी खर्च केलेल्या महापालिकेला त्याचा हिशोब द्यावा लागेल.
शिवसेनेनं नाल्यावर शेती करण्याची नवीन योजना सुरू केला आहे.”
विषय दाव्याचा नाही वाद्याचा आहे…
“मुंबईतील mumbai ३० वॉर्ड असे आहेत, जे शिवसेना आणि काँग्रेसला कधीही जिंकता येणार नाहीत. त्यामुळे या वॉर्डांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे.
७० कोटी खर्च करुन केलेली नालेसफाई संपूर्ण आभासी आहे.
विषय दाव्याचा नाही वाद्याचा आहे.
मुंबईकरांना शब्द दिला होता, मुंबई तुंबू देणार नाही.
आता बचाव करू नका, पळून जाऊ नका. ५ लाख मॅट्रिक टन गाळ काढला म्हणता, मिठी नदीचा जरी गाळ पकडला तरी तो टाकला कुठे? ते सरकारी डम्पिंग ग्राऊंड असेल, तर गाळ टाकल्याचा फोटो दाखवा, खासगी असेल तर सीसीटीव्ही दाखवा, गाळ कुठे मोजला त्या वजन काट्याच्या पावत्या दाखवा,” असं आव्हान शेलार यांनी दिलं होतं. काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले.
कृपया हे देखील वाचा:
मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात 9 ते 12 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा, मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश
वाहन आणि मोबाईल चोरी करणार्या सराईतांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकानं पकडलं, 7 गुन्हयांची उकल
एकनाथ खडसेंची भाजपवर सणसणीत टीका; चंद्रकांत पाटील म्हणतात – ‘ते अजूनही आमचे नेते…’
कामगार तरूणाने मित्रांना बोलावून सुपरवायझरवर केले कोयत्याने वार, नर्हे येथील घटना