रोहित चौगुले (वय 21) व तुषार चव्हाण (वय 21) या दोघांना अटक केली आहे. तर त्याचे साथीदार पसार झाले आहेत. याप्रकरणी संदीप नाईक (वय 43, नऱ्हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे परिसरात एक कंपनी आहे. स्टिकर बनविण्याची हि कंपनी आहे. तेथे फिर्यादी सुपरवायझर आहेत.
तसेच तुषार हा येथे काम करत होता.
यादरम्यान काही दिवसापूर्वी फिर्यादी सुपरवायझर हे कंपनीत असताना तुषार हा त्यांना दुसऱ्या विभागात फिरत असताना दिसून आला.
यामुळे त्यांनी तुषारला चहा नाश्ता करून घे आणि तुला दिलेले काम कर असे सांगितले.
याचा राग तुषार याला आला होता.
त्याने या रागातून तीन दिवसापूर्वी फिर्यादी यांना रात्री 9 च्या दरम्यान नऱ्हेत गाठले तसेच त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले.
तर इतरांनी लाकडी बांबूने बेदम मारहाण केली आहे. यात फिर्यादी हे जखमी झाले. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
ब्लॅक फंगसवरील उपचाराचा खर्च कमी करण्यासाठी पर्याय
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ होणार, जाणून घ्या
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे दिल्ली जाणार, पंतप्रधान मोदींची घेणार भेट !
‘पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती’, नितेश राणेंचा अजित पवारांवर हल्लाबोल