मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा आता छोट्या पडद्यावर उलगडली जाणार आहे. ‘भीमराव: एक गौरवगाथा’ असे या मालिकेचे नाव असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून अर्थातच १४ एप्रिलपासून स्टार प्रवाह या वाहिनीवरसुरू होणार आहे.
देशातील नवीन पिढींना इतिहास माहित व्हावा, या देशात कोणी कोणी काय काय केले या सर्व गोष्टींचा अभ्यास व्हावा यासाठी चित्रपटांद्वारे तसेच माहलिकेद्वारे त्यांची जीवनगाथा दाखवल्या जाते. शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी, संभाजी महाराज, अश्या अनेक महापुरुषांवरील मालिका दाखवण्यात येते. विशेष म्हणजे आता भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा आता छोट्या पडद्यावर उलगडली जाणार आहे. ‘भीमराव: एक गौरवगाथा’ असे या मालिकेचे नाव आहे. नुकताच स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘भीमराव: एक गौरवगाथा’ या मालिकेचे टीझर प्रदर्शित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिलला या मालिकेचा पहिला भाग दाखवल्या जाणार आहे. या मालिकेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मा पासून ते त्यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य दाखवण्यात येणार आहेत.