सांगली : बहुजननामा ऑनलाईन – शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचा १० वर्षापूर्वी जोधाअकबर चित्रपटावरून वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात आला आहे . मराठा क्रांती मोर्चावेळी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
रोजगार मेळावा कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.मराठा क्रांती मोर्चा वेळचे गुन्हे मागे घेतले नाहीत. मात्र भिडे यांच्यावरील गुन्हा मागे घेतल्याने पंढरपूर येथील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजपच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
ते म्हणाले कि कोणतेही गुन्हे तत्काळ मागे घेता येत नाहीत. गुन्हे मागे घेण्याची एक प्रक्रिया आहे. त्याप्रमाणे गुन्हे मागे घेतले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा क्रांती मोर्चावेळी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली. त्या प्रमाणे सध्या प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होऊन गुन्हे मागे घेण्यात येतील.