सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी परिषद महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील मापाडी कामगारांची राज्यव्यापी परिषद रविवार 17 फेब्रुवारी रोजी सोलापूर येथील वि.गु. शिवदारे मंगल कार्यालय येथे आयोजित केली होती. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस तथा सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील पहिल्यांदाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मापाडी कामगारांची ही परिषद महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
सहकारमंत्री सुभाष बापू देशमुख तसेच राज्य कामगार मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते हमाल भवनचे उद्घाटन झाले. या परिषदेस राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील मापाडी कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.