बहुजननामा ऑनलाईन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची खासगी महिला सहाय्यकाला व्हाईट हाऊसमधून काढून टाकले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांची २८ वर्षीय महिला सहाय्यक मेडेलीन वेस्टरहॉटने ऑफ द रेकॉर्ड डिनर दरम्यान पत्रकारांना ट्रम्प कुटुंबाच्या काही वैयक्तिक बाबी उघडकीस आणल्या. म्हणून त्यांनी तिला काढून टाकल्याची माहिती मिळाली आहे.
मेडेलीनने सांगितले की, ट्रम्प यांची मुलगी टिफनी खुप जाड असल्याने त्यांना तिच्या सोबत फोटो काढायला आवडत नाही. तसेच मेडेलीनशी ट्रम्प यांचे संबंध त्यांची लहान मुलगी इवांका हिच्यापेक्षा जास्त जवळचे होते. दरम्यान, मेडेलीन काही दिवसांपुर्वी काही पत्रकार आणि लेखकांसह न्यू जर्सीमधील बर्कले हाइट्स हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणासाठी गेली होती. या भेटीदरम्यान तिने ट्र्म्प आणि त्यांच्या खासगी आयुष्यातील काही रहस्ये सर्वांना सांगितली.
मात्र मेडेलीने सांगितलेल्या या बाबी खोट्या असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ते त्यांच्या मुलींवर अतिशय प्रेम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तिने या सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा ती नशेत असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. तसेच मेडेलीनने स्वतः त्यांना कॉल करुन सांगितले आहे की तिने या सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा ती नशेत होती. याबाबत तिने दिलगिरीही व्यक्त केली.
ट्रम्प यांच्यावर लिहिण्यात आलेल्या एका पुस्तकात ट्रम्प मेडेलीनला माय ब्युटीफुल ब्युटी म्हणून संबोधित करत असल्याचा उल्लेख आहे. तर व्हाईट हाऊसमधील काही अधिकाऱ्यांनी मेडेलीनच्या ईमानदारीवर शंका व्यक्त केली होती.
- आरोग्यविषयक वृत्त –
- घाम जास्त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
- पिस्ता खाल्ल्याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्या असेच ६ फायदे
- सावधान ! चुकीच्या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी
- डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
- पुरुषांमधील ‘ब्रेस्ट कँसर’चे ६ मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- ‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्या याचे १० अमेझिंग उपयोग
- ‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी