बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रभर सुरु असलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप रविवारी सोलापूर येथे होत आहे. यावेळी अनेक नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम देखील होणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदचे सभापती रामराजे निंबाळकर, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, जयकुमार गोरे, बबन शिंदे यांच्यासह काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील, सिद्धराम म्हेत्रे आदी नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
आमदार गोरे यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. माण येथील जागेवर राष्ट्रवादीने दावा केल्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून गोरे हे भाजपच्या संपर्कात होते. तसेच इंदापूरची जागेसाठी देखील काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीने नकार दिल्याने त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर सिद्धराम म्हेत्रे अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात असून आमदार बबन शिंदे यांचीदेखील मुख्यमंत्र्यांशी बोलणी झाली होती. तर, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होत आहे.
भाजपबरोबर शिवसेनेमध्ये देखील मेगाभरती सुरु आहे. शुक्रवारी सांगली जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती साहेबराव पाटील, छाया खरमाटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी ‘मातोश्री’वर भेट देऊन शिवबंधन हाती घेतले. यावेळी माजी आमदार दगडू सकपाळ, नितीन बानगुडे-पाटील आदी उपस्थित होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शीमधील आमदार दिलीप सोपल यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील आणखी काही पदाधिकारीही सेने प्रवेशासाठी पक्षाशी संपर्क साधत आहेत. गुरुवारी अवधूत तटकरे यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची देखील चर्चा सुरु आहे. राणे आपल्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे विलीनीकरण करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या निर्णयाला शिवसेनेना तसेच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे राणे यांच्या भाजपप्रवेशाबाबत अनिश्चितता आहे.
जरी राणेंचा भाजप प्रवेश निश्चित झाला तरी राणेंना हवा असणारा यांना कुडाळ-मालवण आणि देवगड-कणकवली मतदारसंघ मिळणार नसल्याची कल्पना भाजपने राणे यांना दिली आहे. राणे यांना देवगड-कणकवलीमधून नितेश राणे आणि कुडाळ-मालवणमधून निलेश राणे यांना उभे करायचे आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघांची मागणी राणे यांनी केली आहे. शिवसेनेचा विरोध पत्करून राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याबाबत भाजपचे नेतृत्व संभ्रमात आहे.
- आरोग्यविषयक वृत्त –
- घाम जास्त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
- पिस्ता खाल्ल्याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्या असेच ६ फायदे
- सावधान ! चुकीच्या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी
- डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
- पुरुषांमधील ‘ब्रेस्ट कँसर’चे ६ मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- ‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्या याचे १० अमेझिंग उपयोग
- ‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी