https://www.instagram.com/p/
खूप कमी लोकांना माहित आहे की, सोनिया मेहरा ही रेखा यांची मुलगी आहे. सोनिया दिसायलाही खूप सुंदर आहे. रेखा यांनी भलेही सोनियाला जन्म दिला नसला तरी रेखा यांचा पहिला नवरा विनोद मेहरा यांची ती मुलगी आहे. सोनिया विनोद मेहरांच्या तिसऱ्या पत्नीपासून झालेली मुलगी आहे. सोनिया देखील रेखाप्रमाणे सुंदर आहे परंतु सिनेमात मात्र ती त्यांच्यासारखं नाव कमावू शकलेली नाही. सोनिया सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.
https://www.instagram.com/p/
विनोद मेहरा यांनी 3 लग्न केली होती. त्यातील एक लग्न हे रेखा यांच्यासोबत केलं होतं. रेखा आणि विनोद मेहरा यांचं प्रेम सिनेमाच्या सेटवर जुळलं होतं. त्यानंतर त्या दोघांनी गुपचूप लग्न केलं होतं. विनोद मेहरा यांचं फार कमी वयात निधन झालं. त्यावेळी सोनिया फक्त 2 वर्षांची होती. वडिलांच्या निधनानंतर सोनिया केनिया व लंडनमध्ये लहानाची मोठी झाली. तिच्या आजी आजोबांनी तिचं पालन पोषण केलं जे परदेशात रहात होते.
https://www.instagram.com/p/
सोनियानं वयाच्या 8 व्या वर्षापासून अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. तिनं खूप कमी वयात लंडन अकॅडमी ऑफ म्युझिक अँड ड्रामेटीक आर्ट्सच्या अक्टींग एग्जामिनेशनमध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं. सोनिया एक उत्तम डान्सरदेखील आहे. वयाच्या 17 व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून ती भारतात परतली. त्यानंतर तिनं अनुपम खेर यांच्या अॅक्टींग इंस्टिट्युटमधून 3 महिन्यांचा कोर्स केला.
https://www.instagram.com/p/
सोनियानं 2007 साली अनुपम खेर यांच्यासोबत व्हिक्टोरिया नंबर 203 सिनेमात काम केलं. यात जिमी शेरगिल देखील मुख्य भूमिकेत होता. याशिवाय सोनियानं रागिनी एमएमएस सिनेमातही काम केलं आहे. यात तिनं तान्या कपूरची भूमिका केली होती. सिनेमाव्यतिरीक्त सोनियानं लहान पडद्यावरील काही टीव्ही शोज होस्ट केले आहेत. तिनं एमटीव्ही सोबत काही शोज जसे की, एमटीव्ही ग्राईंड, एमटीव्ही न्यूज आणि एमटीव्ही स्टाईल चेकमध्ये व्हिजे म्हणून झळकली आहे.
https://www.instagram.com/p/
https://www.instagram.com/p/
https://www.instagram.com/p/
https://www.instagram.com/p/
https://www.instagram.com/p/
https://www.instagram.com/p/
https://www.instagram.com/p/B_
https://www.instagram.com/p/B-
https://www.instagram.com/p/
https://www.instagram.com/p/
https://www.instagram.com/p/