औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – मराठा समाजातील तरुणांसाठी योजना राबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उद्दिष्ट अपूर्ण राहत आहे. परिणामी मराठा समाजातील तरुणांच्या मनात राज्य शासनाविरुद्ध खदखद निर्माण होत आहे. या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चातर्फे महामंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात अप्पासाहेब कुढेकर, रमेश केरे, किशोर शिरवत, रवि काळे, किरण काळे, राहुल पाटील, मनीष जोगदंड आदींसह शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांचा सहभाग होता. यावेळी शासनाने मराठा समाजासाठी सुरू केलेल्या योजनांच्या परिपत्रकाचे दहन करण्यात आले. तसेच राज्य शासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली..