अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – अवघ्या 6 महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेचा (married girl) विहिरीत मृतदेह आढळला आहे. पढेगाव (ता. कोपरगाव) परिसरात गुरुवारी (दि. 3) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे विवाहितेने (married girl) आत्महत्या केल्याची चर्चा सुरु असतानाच तिच्या माहेरच्यांनी मात्र सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात केल्याचा आरोप माहरेच्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसानी चहूबाजूंनी तपास सुरु केला आहे.
पुजा सागर मापारी (वय 24) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजाचे लग्न 6 महिन्यांपूर्वीच झाले होते.
लग्न झाल्यापासून सासरच्या लोकांनी वारंवार पैशाची मागणी केल्याचा आरोप पुजाच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.
पैशाची मागणी करत तिच्यावर अनेकदा मानसिक अन् शरीरिक छळ झाल्याची तक्रारही तिच्या माहेरच्या लोकांनी केली आहे. तसेच आमच्या मुलीने आत्महत्या Suicide केली नसून तिचा घातपात केल्याचा आरोप माहरेच्यांनी केला आहे. या प्रकरणी आरोपींना तातडीने शिक्षा करावी, अशी मागणीही मारेच्यांनी केली आहे. पोलिसांनी या सर्व घटनेची माहिती घेतली असून, मृत्यू नेमका कसा झाला, आत्महत्या आहे की घातपात याचा तपास घेण्यास सुरुवात केली आहे. कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव करत आहे.
कृपया हे देखील वाचा:
शिक्षकांसाठी खुशखबर ! TET वैधतेबाबत महत्त्वाचा निर्णय, आयुष्यभर राहणार प्रमाणपत्राची वैधता
राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक, 18 जिल्हे पूर्णपणे Unlock; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती
जगातील सर्वात ‘स्वस्त’ लस भारतात येणार?, लसीकरणाला मिळणार गती