नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनातून बरे (Coronavirus recovery) झाल्यानंतर शरीरात खुप जास्त कमजोरी असते. अशावेळी चांगला आहार घेणे आवश्यक आहे. कमजोरीचे सर्वात मोठे कारण असते पौष्टिक आहार सेवन न करणे. तुम्ही सुद्धा कोरोनातून रिकव्हर (Coronavirus recovery ) झाला असाल परंतु शरीरात कमजोरी खुप आहे तर काही खास डाएट टिप्स अवलंबा.
असा घ्या आहार
1 डब्ल्यूएचओनुसार पौष्टिक आहारात ताजी फळे, डाळी, बीन्स, हिरव्या भाज्या, मका, बाजरी, गहू आणि बटाटा सेवन करा.
2 व्हिटॅमिन सी, डी, मिनरल्स आणि झिंक असलेले पदार्थसेवन करा.
3 हलका आहार घ्या. ताजे अन्न खा.
4 आंबट फळे सेवन करा.
5 एक खजूर, दोन बदाम, मुठभर मनुके आणि दोन आक्रोड खा. हा सुकामेवा रात्री भिजत टाका आणि सकाळी खा.
6 रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हलका व्यायाम करा. पण हळुहळु वॉकने सुरूवात करा.
7 लवकर उठा, रात्री लवकर झोपा.
या गोष्टी लक्षात ठेवा
* मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा.
* कोरोना रिकव्हरीनंतर आठवड्यानंतर सुद्धा ऑक्सीजन, ब्लड प्रेशर आणि ताप तपासा.
* डायबिटिक असाल तर दिवसात दोन वेळा शुगर टेस्ट करा.
* शरीर हायड्रेट ठेवा. पाणी प्या, लिंबूपाणी, ताक प्या.
* गॅझेट्सचा वार मर्यादित करा. टीव्ही सुद्धा कमी पहा.
कृपया हे देखील वाचा:
6 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह, माहेरच्यांनी केला घातपाताचा आरोप
शिक्षकांसाठी खुशखबर ! TET वैधतेबाबत महत्त्वाचा निर्णय, आयुष्यभर राहणार प्रमाणपत्राची वैधता
राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक, 18 जिल्हे पूर्णपणे Unlock; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती
जगातील सर्वात ‘स्वस्त’ लस भारतात येणार?, लसीकरणाला मिळणार गती