नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र पुरेशा लसीचा साठा उपलब्ध नसल्याने लसींची टंचाई जाणवत आहे. असे असतानाच आता कोविशील्डची निर्मिती करणा-या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनासाठी परवानगी मागितली आहे. यासाठी सीरमने डीसीजीआयकडे अर्ज केला आहे. डीसीजीआयने DCGI सीरमला स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करण्याची परवानगी दिल्यास लसींचे उत्पादन अतिशय गतीमान होईल. जगातील सर्वात मोठी औषध उत्पादक कंपनी असा सीरमचा लौकिक आहे.
सीरम सध्या पुण्यात कोविशील्ड लसींच उत्पादन करत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकान यासाठीचे संशोधन केले असून निर्मितीची जबाबदारी सीरमकडे आहे. कोविशील्ड लसीच्या उत्पादनाला वेग देताना सीरमने आता स्पुटनिकच्या निर्मितीसाठीही अर्ज केला आहे. सध्या स्पुटनिक व्ही लसीच उत्पादन डॉ. रेड्डीच लॅबोरेटरीजकडून केले जात आहे. दरम्यान सीरम जून महिन्यात कोविशील्डच्या 10 कोटी डोसचं उत्पादन करणार असल्याची माहिती यापूर्वीच सरकारला दिली आहे. सीरम सध्याच्या घडीला नोवावॅक्सचीदेखील निर्मिती करत आहे. नोवावॅक्सला लवकरच अमेरिकेकडून मंजुरी मिळू शकते. रशियन लस असलेल्या स्पुटनिक व्ही लसीच्या आपत्कालीन वापरास डीसीजीआयने DCGI एप्रिलमध्ये परवानगी दिली आहे. स्पुटनिक व्ही लसीचे 30 लाख डोस काही दिवसांपूर्वीच रशियाहून हैदराबादला आले. देशात आयात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा लसींचा साठा आहे.
कृपया हे देखील वाचा:
राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक, 18 जिल्हे पूर्णपणे Unlock; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती
जगातील सर्वात ‘स्वस्त’ लस भारतात येणार?, लसीकरणाला मिळणार गती
सूर्यग्रहण 10 जून रोजी, 15 दिवसांच्या आत दोन ग्रहणांमुळे होणार उलथा-पालथ?
ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्यातील इयत्ता 12 वीच्या परीक्षा अखेर रद्द