छत्तीसगड : वृत्तसंस्था – Crime News | छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहानंतर दोनच महिन्यात पत्नीचा अपघाती मृत्यू (Death) झाला. त्यांनतर निराश झालेल्या पतीने ज्या ठिकाणी पत्नीचे अंत्यसंस्कार झाले त्या स्मशानातच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना छत्तीसगड मधील बालोद (Balod) या गावात घडली आहे. मनीष नेताम असं आत्महत्या (Crime News) केलेल्या युवकाचे नाव आहे. मनीष हा पोलीस (Police) म्हणून कार्यरत होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अधिक माहितीनुसार, मनीष नेतामचे (Manish Netam) दोन महिन्यांअगोदर लता नावाच्या तरुणीबरोबर विवाह (Marriage) झाला होता. मनीषने त्यापूर्वी अगोदरच त्या गावात नवीन घर देखील बांधले होते. दरम्यान, नवीन घर बांधून विवाह करुन मनीष व लता हे दोघे सुखी संसार जगत होते. दरम्यान, त्याच्या संसारावर काळाने घाला घातला. मनीष हा कामाला गेलेला असताना त्या दिवशी पत्नी लताचा घरातील लादीवरून पाय घसरला. ती जमिनीवर जोरात आपटली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने, दुखापत झाली आणि लताचा मृत्यू (Death) झाला. लताच्या मृत्यूचे दुख मनीषला सहन होत नव्हते. तो रोज पत्नी लताचे अंत्यसंस्कार झाले त्या स्मशानात जाऊन बसायचा.
या दरम्यान, बुधवारी नेहमीप्रमाणे मनीष स्मशानात गेला. तेथून त्याने त्याच्या मोठ्या भावाला व्हॉट्सॲपवर एक मेसेज पाठवला आणि त्यानंतर तेथेच असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) करत आपलं देखील जीवन संपवलं आहे.
Web Title : Crime News | man suicide after few days of death of his wife
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Police Suspended | आरोपीला मदत करणे पडले महागात, पोलिसाचे तडकाफडकी निलंबन; जाणून घ्या प्रकरण