मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Chehre | अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) आणि रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) याच्या चेहरे (Chehre) चित्रपटाची चाहते अतुरतेने वाट पाहत होते. अगोदर हा चित्रपट एप्रिलमध्ये पदर्शित (release) होणार होता परंतु कोरोना महामारीमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. आता या चित्रपटाची पदर्शनाची नवीन तारीख समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना ही खुशखबर दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, जर तुमच्यापैकी कुणी एखादा गुन्हा केला असेल तर येथून सांभाळून जा. कारण हा खेळ तुमच्या सोबत सुद्धा खेळला जाऊ शकतो.
प्रदर्शनाची तारीख आली समोर
अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ शेयर करत लिहिले आहे की – सावधान. तुम्हाला इशारा दिला जात आहे. या गेमला तोंड देण्यासाठी तयार रहा. कारण हा आरोप तुमच्यावर सुद्धा लावला जाऊ शकतो. ‘चेहरे’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये 27 ऑगस्ट (27 Augast) ला प्रदर्शित होत आहे.
या व्हिडिओला 4 लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.
काय म्हणाले निर्माते…
चेहरेचे निर्माते आनंद पंडित (producer Anand Pandit) यांनी चित्रपट प्रदर्शित होण्याबाबत म्हटले आहे की, माझ्या डोक्यात काहीही शंका नाही की हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होईल.
चेहरे मोठ्या पडद्यावर एक वेगळा ठसा उमटवणार आहे.
मी चित्रपटगृहांमध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट पहात मोठा झालो आहे आणि मिस्टर बच्चन यांना मोठ्या पडद्यावर आणणे माझ्या प्रॉडक्शन हाऊससाठी शानदार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक रुमी जाफरी (director Rumi Jaffrey) यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे. चेहरेचा ट्रेलर यापूर्वी प्रदर्शित झाला आहे.
Web Title :- chehre amitabh bachchan emraan hashmi starrer chehre gets new release date
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Police Suspended | आरोपीला मदत करणे पडले महागात, पोलिसाचे तडकाफडकी निलंबन; जाणून घ्या प्रकरण