मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवैध शस्त्रे बनविणाऱ्यां टोळीचा पर्दाफाश केला असून चार जणांना अटक केली. दिल्ली पोलिसांच्या पथकाने हरियाणाच्या मेवात येथून ही अटक केली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी 10 शस्त्रे जप्त केली आहेत आणि शस्त्रे बनवण्यासाठी वापरलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत.
गेल्या आठवड्यात गुरुग्रामच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधील भरतपूर येथे छापा टाकला आणि बेकायदा शस्त्रास्त्रांच्या कारखान्याचा भंडाफोड केला. पोलिसांनी घटनास्थळावरून एका आरोपीलाही अटक केली. उमर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत उमरने गुरुग्राम, मेवात आणि जवळपासच्या भागात सातशे बेकायदा शस्त्रे तयार केली आणि पुरविली आहे. पोलिसांनी कारखान्यात बनवलेले अनेक शस्त्रेही जप्त केली. तपासणी दरम्यान पोलिसांना कळले की उमरने आतापर्यंत सुमारे ७०० अवैध शस्त्रे पुरविली आहेत. उमरने नेमक कोणत्या लोकांना शस्त्रे दिली आहेत याचा पोलिस आता तपास करीत आहेत. उमर गावठी कट्टा ५ हजारात तर बंदूक १५ हजारात विकत होता.