हैदराबाद: बहुजननामा ऑनलाईन – आंध्रप्रदेश विधानसभेचे माजी सभापती कोडेला शिवप्रसाद राव यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोडेला यांनी स्वत: च्या घरात गळफास लावून घेतला. बेशुद्ध अवस्थेत त्यांना हैदराबादच्या इंडो अमेरिकन कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
तेलगू देसम पक्षाचे नेते राव हे बर्याच दिवसांपासून मानसिकरित्या आजारी होते. त्यांच्यावर नैराश्यावरही उपचार सुरू होते. सततचा आजार आणि तणावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज त्यांच्या कुटुंबियांनी वर्तविला आहे. त्याचप्रमाणे आंध्रमध्ये वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या मुलावर आणि मुलीवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करण्यात आल होते.
तर विधानसभेचे सभापती असताना तेथील टेबल-खुर्च्या आपल्या मुलाच्या शोरूममध्ये पाठवल्याचा आरोपही कोडेला यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात चौकशीही सुरू होती.