बहुजननामा ऑनलाइन टीम : अमेरिकेची सुप्रसिद्ध कंपनी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी खुलासा केला आहे की, कंपनीने नुकतीच सादर केलेली सायबरट्रॅकची डिजाइन जेम्स बाँड यांच्या चित्रपटाद्वारे काही प्रमाणात प्रेरित आहे. १९७७ मध्ये रिलीज झालेल्या जेम्स स्पायच्या ‘The Spy Who Loved Me’ या चित्रपटामध्ये एक कार दिसत आहे जी केवळ रस्त्यावरच चालत नाही तर पाण्यात तरंगणारी आहे. त्याचबरोबर एका अहवालानुसार, एलोन मस्कने या चित्रपटातील वापरलेली गाडी लिलावाद्वारे ७ कोटी १५ लाख रुपयांमध्ये खरेदी केली. चला या कारमागील कथा जाणून घेऊया.
नोव्हेंबरमध्ये टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी सायबेरट्रक नावाच्या लाइट कमर्शिअल गाडीची डिजाइन सादर केली. बॅटरीवर चालणाऱ्या सायबरट्रकची किंमत सुमारे २९ लाख रुपयांपासून सुरू होते. २०२१ पासून त्याची विक्री सुरू होईल. पण बुकिंग ७ हजार रुपयांपासून सुरू झाले आहे.
सायबर ट्रक या डिझाईनमध्ये मदत ज्या कारकडून मिळाली आहे त्याला जोडप्याने फक्त ७ हजार रुपयांमध्ये खरेदी केली. पण ते जेम्स बाँड यांच्या चित्रपटाचे प्रेक्षक नव्हते. त्यामुळे सुरुवातीला त्यांना या कारचे महत्त्व माहित नव्हते.
मिळालेल्या माहितीनूसार, न्यूयॉर्कच्या लाँग आयलँडमधील रहिवासी असलेल्या जोडप्याने १९८९ मध्ये स्टोरेज युनिट खरेदी केली. हा एक लिलाव होता. जेव्हा या जोडप्याने ७ हजारांमध्ये विकत घेतलेला स्टोरेज युनिट खोलले तेव्हा त्यांना १९७६ ची ‘Lotus Esprit’ स्पोर्ट्स कार सापडली. १९७७ मध्ये जेम्स बाँड यांचा चित्रपट ‘The Spy Who Loved Me’ही कार वापरली होती.
जेम्स बाँडच्या ‘The Spy Who Loved Me’ या चित्रपटात एकूण आठ कार वापरण्यात आल्या. पण फक्त एक गाडी पाण्याखाली वापरली गेली. तीच कार अमेरिकन जोडप्यांना स्टोरेज युनिटमध्ये सापडली. नंतर जेव्हा कपलला सत्य कळले तेव्हा त्यांनी हा चित्रपट पाहिला.
‘The Spy Who Loved Me’या चित्रपटामध्ये कार पाण्याखाली पोहण्याची क्षमता असल्याचे दर्शविले आहे. एवढेच नाही तर पाण्याखाली जाऊन कार गोळीबार ही करताना दिसते. कारची वास्तविकता जाणून घेतल्यानंतरही या जोडप्याकडे पुढील २० वर्षे ही कार होती. अखेर २०१३ मध्ये त्यांनी त्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. RM Sotheby नावाच्या कंपनीने या कारचा लिलाव केला आणि एका अज्ञात व्यक्तीने त्यासाठी ७ कोटी रुपयांची बोली लावली. नंतर अज्ञात व्यक्ती एलोन मस्क असल्याचे उघडकीस झाले.
Visit : bahujannama.com