बहुजननामा ऑनलाइन टीम : देशभरात राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या गाड्यांसाठी टोल प्लाजावर एक विशेष नियम लागू करण्याचा निर्णय परिवहन राष्ट्रीय राजमार्ग मंत्रालयाकडून करण्याला आला आहे. १५ डिसेंबर २०१९ पासून टोल नाक्यावरुन जाणाऱ्या गाड्यांना ‘FASTTAG’ चा वापर करुन टोल भरणे अनिर्वाय होणार आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. टोल नाक्यावर गाड्यांची वाढत्या रांगा आणि प्रदूषण दोन्हींवर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयात तुम्हीही सामील होऊ शकता. सरकारच्या या निर्णयामुळे तुम्हाला ५० हजार रुपये खर्च करुन लाखो रुपये कमवण्याची संधी समोर आली आहे.
व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणती संधी आहे. जाणून घ्या
देशभरात महामार्गावर चालणाऱ्या चारचाकी त्यापेक्षा अधिक चाक असणाऱ्या गाड्यांना फास्टॅग लावणे अनिर्वाय आहे. अशा वाहनांना तुम्ही १५ डिसेंबरआधी फास्टॅग विकू शकता. फास्टॅगसाठी पॉइंट ऑफ सेल एजंट होण्यासाठी तुम्हाला ३ गोष्टी सर्वात महत्वाच्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कंप्युटर आणि त्यातील काही बेसिक गोष्टींची माहिती आवश्यक आहे. एक लॅपटॉप किंवा डेस्कटॉप, प्रिंटर आणि बायोमॅट्रिक डिवाइस असणं आवश्यक आहे. आरटीओ एजंट, कार डीलर, कार डेकोर,ट्रांसपोर्ट, पीयूस सेंटर, फ्युसिंग स्टेशन, इन्शुरन्स एजंट पॉइंट ऑफ सेल एजंट असे अनुभव असणाऱ्यांना सगळ्यात प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. या व्यवसायातून तुम्हाला साधारण ५० लाख रुपये कमवण्याची संधी मिळू शकते.
फास्टॅग म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा ?
फास्टॅग ही एक एलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा आहे. राष्ट्रीय महामार्गावर ही फास्टॅग सुविधा उपलब्ध होणार आहे. रेडिया फ्रिक्वेंसी आइडेन्टिफिकेशन प्रिंसिपलवर ही यंत्रणा काम करते. वाहनांच्या विंडस्क्रिनवर फास्टॅगला लावण्यात येते. टोलप्लाझावर असलेल्या सेंसरद्वारे त्याला स्कॅन केले जाते. स्कॅन केल्यानंतर टोल कापला जातो. त्यामुळे टोल नाक्यावर गाड्यांना थांबून राहावे लागत नाही. या यंत्रणेमुळे ट्राफीक आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. एकदा लावलेला फास्टॅग हा 5 वर्षांपर्यंतच वैध धरला जातो.
Visit : bahujannama.com