बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाचा विळखा वाढत असल्यामुळे धारावीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली असताना आता अजून एक रुग्ण सापडला आहे. धारावीत एका सफाई कर्मचार्याला कोरोनाची लागण झाली आहे. वरळी कोळीवाडयापाठोपाठ दाटीवाटीच्या धारावी परिसरात कोरोनाने शिरकाव केला असल्याने धोका निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या 52 वर्षीय सफाई कर्मचार्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा सफाई कर्मचारी वरळीचा रहिवासी असून धारावीत त्याला तैनात करण्यात आले आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्याने अधिकार्यांना त्याला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले होते. वरळी कोळीवाडयापाठोपाठ दाटीवाटीच्या धारावी परिसरात करोनाने शिरकाव केला असल्याने धोका निर्माण झाला आहे.
रुग्ण राहात असलेल्या परिसरातील आठ इमारतींमधील 308 सदनिकांमधील नागरिकांना घऱाच क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर वरळी कोळीवाडा येथील 86 नागरिकांना पोद्दार रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे