बहुजननामा ऑनलाईन – कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात नवं नवीन गोष्टीची माहिती समोर येत आहेत. जगातील शास्त्रज्ञ कोरोना संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाची प्रचंड भीती निर्माण झाली आहे. WHO ने सांगितल्यानुसार ,कोरोना संसर्गाची लागण निरोगी व्यक्तीला देखील होऊ शकते. यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर वापरणे गरजेचं आहे.
या संसर्गाबाबत सोशल मीडियावरती अनेक अफवा देखील पसरवल्या गेल्या. सध्या एक प्रश्न उपस्थित केला जात आहे. तो म्हणजे गॅस पास केल्यामुळे म्हणजेच पादल्यामुळे कोरोना संसर्गाची लागण होऊ शकते का? यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला अधिक माहिती सांगणार आहोत.
WHO ने सांगितल्यानुसार, कोरोना संसर्गाचा प्रसार हवेमार्फत होत नसून एखाद्या संसर्गित व्यक्तीच्या शिंकण्यातून किंवा खोकण्यातून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समुळे हा विषाणू पसरत जातो. कारण ड्रॉपलेट्सचे वजन असल्यामुळे हवेमार्फत प्रसार होऊ शकत नाही. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यासाठी हात पाय स्वच्छ धुणे गरजेचं आहे.
कोरोनाचा संसर्ग गॅस पास केल्यामुळे पसरू शकतो का? या प्रश्नावर बीजींगमधील तज्ञांनी माहिती दिली आहे. जर कोरोना संसर्गाची बाधा झालेला एखादा रुग्ण गॅस सोडत असेल तर त्याच्या बाजूला असलेल्या व्यक्तीला कोरोना संसर्गाची लागण होऊ शकते. पण CDC ने सांगितलेल्या रिपोर्टनुसार गॅस (Farts) कोरोना संसर्गाचा प्रसार होण्याचं कारण ठरू शकत नाही. कारण कोरोना संसर्गित असलेल्या व्यक्तीची पॅण्ट दुसरा व्यक्ती जोपर्यंत घालत नाही. तोपर्यंत विषाणूचा धोका नसतो. कारण पॅण्ट विषाणू निवारक मास्कची भूमिका निभावत असते. दरम्यान, कोरोना संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी कोणतेही औषध अथवा लस शोधण्यात आलेली नाही. त्यासाठी विविध देशातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरु आहेत.