मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी कोरोनाने शिरकाव केला आहे. ‘तेथील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकीचा समावेश आहे. यानंतर शरद पवार यांचीही चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
Four persons at NCP chief Sharad
Pawar's home in south Mumbai test positive for
coronavirus, says Maharashtra Health Minister Rajesh Tope; Pawar tests negative— Press Trust of India (@PTI_News) August 17, 2020
राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्व्हर ओकमधील 4 लोक पॉझिटिव्ह सापडले आहेत. संसर्ग झालेले सुरक्षारक्षक बर्याचदा लोकांना शरद पवारांपासून दूर करण्याचे काम करत असतात. त्यातून त्यांना लागण झाली असल्याची शक्यता आहे. दरम्यान शरद पवार यांची रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात चाचणी करण्यात आली. त्यांना काहीही समस्या नाही. ते अत्यंत सुरक्षित आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. राज्यात फिरु नका अशी विनंती साहेबांना करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.