रांची : वृत्तसंस्था – लालूप्रसाद यांच्यावर रांचीतील रिम्स रुग्णालयात उपचार सुरु असून याच रुग्णालयात चौथ्या मजल्यावर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांसाठी विशेष वॉर्ड तयार करण्याचा निर्णय रुग्णालयाने घेतला आहे. लालूप्रसाद यांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी रुग्यालयाचे अधीक्षक डॉ. विवेक कश्यप यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. डॉ. कश्यप हे रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर आयसोलेशन वॉर्डसाठी जागेची पाहणी करण्यासाठी गेले असताना त्याचवेळी लालू यांनी आक्षेप घेतला. त्यामुले लालूप्रसाद यांचा विरोध असल्याने रुग्णालय प्रशासनाने इमारतीमध्ये कोरोना आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचा निर्णय मागे घेतला.
मागच्या काही दिवसात रिम्समध्ये कोरोना असल्याचा संशय आल्याने तीन रुग्ण तपासणीसाठी आले असताना दोघांना चाचणी करून सोडून दिले. तर तिसऱ्या व्यक्तीला उपचारासाठी भरती करून घेतले. त्याचे उपचार डॉ. विद्यापती युनिटमध्ये चालू असून त्याला दुसऱ्या वॉर्डमध्ये चौथ्या मजल्यावर शिफ्ट करण्याचा विचार असून त्यासंदर्भातही पाहणी झाली होती. पण याची माहिती मिळताच लालू संतापले आणि त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. नंतर हा निर्णय रद्द करत रिम्सच्या अधीक्षकांकडे चौकशी केली तर त्यांनी बोलण्यास नकार दिला.
लालूप्रसाद हे चारा घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असून प्रकृतीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. देशात कोरोनाचा प्रसार होण्याआधीच लालूप्रसाद यादव यांनी कोरोनाचा धसका घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी बुधवारी तळमजल्यावरील वॉर्डमध्ये एका कोरोना संशयित रुग्णाला उपचार करण्यासाठी दाखल केले असताना धसका बसल्याचे समजते आहे. ते फिरण्यासाठी त्यांच्या रूमबाहेर पडत असतात. त्यामुळेच लालूप्रसाद यांनी कोरोनाचा संशयित रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांनी आपल्या रुमच्या बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून ते आपल्या रुममधून बाहेर पडलेले नाहीत.