लखनऊ : वृत्तसंस्था – सीएए आणि एनआरसीमुळे जाळपोळ करणाऱ्यांविरुद्ध लखनऊ जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये हिंसा करणाऱ्यांना चिन्हांकित करत ५७ निदर्शकांचे चेहरे, त्यांचे नाव आणि पत्ते प्रशासनाने सार्वजनिक केले आहे.
हजरतगंजसह अनेक चौकांवर या चिन्हांकित उपद्रविंची फोटो असलेले होर्डिंग लावले असून १,५५,६२,५३७ रु.ची वसुलीचा आदेश दिला गेला आहे.
याबाबत डीएम अभिषेक प्रकाश यांनी म्हटले आहे की, जर ठरलेल्या वेळेस लोकांनी दंड भरला नाही तर त्यांना जोडले जाईल. शहराच्या हसनगंज,हजरतगंज, कैसरबाग आणि ठाकूरगंज परिसरात ५७ लोकांकडून ६७.४६ लाख रु.ची वसुलीही प्रशासनाने केली आहे.