नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इटलीतील एका गावातील लोकं आश्चर्य झाले असून तेथील पाण्याच्या नळातून लाईम ब्रुस्को स्पार्कलिंग रेड वाईन येऊ लागल्याने लोकं आश्चर्यचकित झाले आहेत. ही घटना बोलोगनाजवळील एका गावातील असून चार मार्चला जेव्हा गावातील लोकांनी त्यांच्या इथे पाण्यासाठी नळ चालू केला तर तिथे पाण्याच्या जागी लाईम ब्रुस्को स्पार्कलिंग रेड वाईन पडताना दिसून आली. जवळच एका वाईनरीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. लोकांनी आपल्या घरात येणाऱ्या वाईनला फेकून दिले नाही तर त्याचा वापर केला.
काही स्थानिक लोकांनी या घटनेनंतर पाणीपुरवठ्याच्या सुरक्षेवर प्रश्न केले आहेत. काही जण असेही होते की या घटनेमुळे ते आनंदी होते. काही स्थानिक लोकांनी बाटल्यांमध्ये भरून घेतली जेणेकरून दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात याचा वापर करता येईल, असे समजले आहे.
Red wine flows from water taps in Italian village after a technical fault at a local winery pic.twitter.com/I6rf2O7DkU
— The Sun (@TheSun) March 6, 2020
एका व्यक्तीने म्हटले की, मला माहित नाही की हा एका प्रकारचा प्रसिद्धी स्टंट आहे की तो आपल्याला हसवत आहे किंवा ही एक गंभीर समस्या आहे. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले की, ज्यांची जबाबदारी आहे ते पूर्ण चौकशी करतील. तुम्ही यावर हसाल पण ही काही छोटी गोष्ट नाही. घटनेनंतर वाईनरीने आपल्या फेसबुक पेजवर लोकांची माफी मागितली आहे.