नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात मागच्या शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत १० टक्क्याने घसरण झाली असून ही घट ओपेक देशांद्वारे प्रोडक्शनमध्ये कपात न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिसून आली आहे. यूएस WTI आणि ब्रेंट क्रूडच्या भावात घट झाली आहे. दोन्ही कच्च्या तेलाच्या भावात क्रमशः १०.०७ टक्के आणि ९.४ टक्के घसरण झाली असून ओपेक आणि त्यांचे सहयोगी देशांमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान क्रूड प्रोडक्शनमध्ये कपात करण्याबाबत चर्चा होऊ शकली नाही.
काय आहे WTI आणि ब्रेंट क्रूडचा भाव
शुक्रवारी यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट क्रूडचा भाव ४.६२ डॉलर म्हणजे १०.०७ टक्क्यापर्यंत खाली आला होता. यानंतर WTI चे भाव ४१.२८ डॉलर प्रति बॅरल असताना तो आता २०१६ नंतर सर्वात कमी आहे. तर ब्रेंट क्रूड बाबत सांगायचे तर याच्या भावात ९.४ टक्के घट झाली असून नंतर ब्रेंट क्रूडचे भाव ४५. २७ डॉलर प्रति बॅरल झाले आहेत. जून २०१७ नंतर आता सर्वात कमी भाव आहे.
क्रूड उत्पादनाच्या कपातीबाबत बोलणे शक्य झाले नाही
कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपातीबद्दल एकमत झाले नसून ओपेक आणि त्यांच्या सहयोगी देशांनी परत एकदा बैठक करण्याबाबत बोलले आहे. पण याअगोदर उत्पादनात कपातीबाबत निर्णय झाला असून मार्चच्या शेवटपर्यंत चालणार आहे. पुढेही ते लागू करणार आहे का नाही याबद्दल अनिश्चितता आहे. रशियाचे ऊर्जामंत्री एलेक्झांडर नोवाक यांनी बैठकीत १ एप्रिलपर्यंत कोणताही सदस्य आपल्या रणनीतीच्या हिशोबाने तेलाचे उत्पादन करणार नाही. आम्ही हा निर्णय यासाठी घेतला आहे की उत्पादनात कपात करण्याबाबत कोणतेही एकमत होऊ शकले नाही. असे त्यांनी म्हटले आहे.
२००८ मध्ये सर्वात मोठी कपात केली गेली होती
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून कच्च्या तेलाची मागणी कमी होत असून यामुळेच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सतत घसरण होत आहे. २००८ मध्ये ओपेक आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन ४२ कोटी बॅरलने कमी केले होते. ग्लोबल फायनान्शियल संकटांचा हा काळ होता. या निर्णयानंतरच कच्च्या तेलाच्या किंमतीला पाठिंबा दर्शविला गेला.