नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे जगभरात १.५ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो असा दावा ऑस्ट्रेलिया नॅशनल विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार केला जात आहे. महामारीच्या सर्वात चांगल्या स्थितीत पहिल्या एका वर्षाच्या आत दीड कोटी लोकांच्या मृत्यूची शंका आहे. कोरोना व्हायरसमुळे लागतील अर्थव्यवस्थेवरही खूप परिणाम होईल, असेही या अभ्यासात सांगितले जात आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार ऑस्ट्रेलियन नॅशनल विद्यापीठाच्या या अभ्यासात महामारीमुळे सर्वात वाईट परिस्थिती निर्माण झाली तर त्यामुळे ६ कोटी ८० लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावा केला गेला आहे. यातील लाखो लोकं अमेरिका आणि ब्रिटनमधीलही असू शकतात. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे संक्रमित लोकांच्या मृत्यूचे प्रमाण २ टक्के असून जगभरात सध्या ३.४ टक्के दर असल्याचे अभ्यासानुसार समोर आले आहे.
अभ्यासानुसार भारत आणि चीनमध्ये मृतांची संख्या अनेक लाख असू शकते. तर अमेरिकेत २ लाख ३० हजार पर्यंत लोकं याचा शिकार असू शकतात. अमेरिकेत सामान्य इन्फ्लुएंझामुळे ५५ हजार लोकांचा मृत्यू होतो, असा उल्लेख संशोधकांनी केला आहे.
ब्रिटनमध्ये ६४ हजार लोकांचा मृत्यू, जर्मनीमध्ये ७९ हजार आणि फ्रान्समध्ये ६० हजार लोकांचा मृत्यू झाला असल्याची शंका अभ्यासात दर्शवली आहे. सोबतच साऊथ कोरिया आणि इटलीतीलही लोकांना याचा फटका बसला आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार आतापर्यंत जगात कोरोना व्हायरसमुळे ३४०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून १ लाख पेक्षा जास्त लोकं यापासून संक्रमित झाल्याची पुष्टी झाली आहे. भारतात कोरोना व्हायरसने संक्रमित ३३ प्रकरणं समोर आली असून अनके राज्यात संशयित रुग्णांवर लक्ष ठेवले जात आहे.