पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक यंत्रणा युध्दपातळीवर काम करत आहेत. अलिकडील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य सरकारने 1 मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 3 हजार 991 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात कोरोनाचे 4 हजार 789 रूग्ण बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. धक्कादायब बाब म्हणजे दिवसभरात तब्बल 74 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील 55 जणांचा तर पुण्याबाहेरील 19 जणांचा समावेश आहे.
पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 3 लाख 95 हजार 486 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी 3 लाख 39 हजार 571 रूग्ण हे बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात सद्यस्थितीत कोरोनाचे 49 हजार 472 रूग्ण हे अॅक्टीव्ह आहेत. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 1 हजार 364 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांना अतिदक्षता विभागात उपचार देण्यात येत आहेत. आतापर्यंत पुणे शहरात कोरोनामुळं 6 हजार 443 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 22 हजार 227 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 3 हजार 991 जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे.