नवी दिल्लीः वृत्तसंस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. बेड्स, ऑक्सिजन सिलेंडरसह, इंजेक्शन औषधांचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांना भेडसावणाऱ्या या समस्येवर ट्विटरने नवे फिचर बनवले आहे. कंपनीने हे पाऊल कोरोनासंदर्भात उचलले आहे. यात रेमडेसिवीर इंजेक्शन, RTPCR टेस्टिंग, ऑक्सिजन सिलेंडर आणि हॉस्पिटल बेड्स याबाबत विविध माहिती उपलब्ध होणार आहे.
देशभरात ऑक्सिजन, Remdesivir इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत अनेकांना Twitter, Facebook आणि Instagram सारख्या सोशल मीडियाचा आधार मिळत आहे. ते पाहता माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने त्यांच्या Advance Search Feature तयार केला आहे. जे युजर्सला ताजी माहिती आणि उपयुक्त साहित्यांपर्यंत पोहचण्यासाठी मदत होणार आहे. ट्विटरने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशात twitter मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. नव्या फिचरमुळे ताजी माहिती आणि साहित्यांचा शोध घेता येईल. तुम्हाला लवकर सर्च करून मदत मिळावी, हा आमचा प्रयत्न आहे. Advance Search Feature द्वारे ट्विट फिल्टर करता येते. उदा. यूजर्स स्पेसिफिक हॅशटॅग आणि वेळेनुसार सर्च फिल्टरचा वापर करू शकतो. याशिवाय Twitter वर युजर्स असे ट्विट पाहू शकतो जे त्यांच्या आसपासच्या परिसरातील आहेत. यासाठी त्यांना निगडित हॅशटॅग वापरून एक ट्विट करावे लागेल. त्यात Near You बटन टॅग करावे लागेल. या फिचर्सचा उपयोग करण्यासाठी Location ऑन असणे गरजेेचे आहे. लेटेस्ट ट्विट त्यांच्या टाईमलाईनवर सर्वात वर दिसते. त्यासाठी युजर्सच्या त्यांच्या होम टाइमलाईनवर टॉपकडून उजव्या बाजूस स्पार्कल बटन वर टॅप करावे लागणार आहे.