मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच दररोज ओमिक्रॉनचे (Omycron Variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल 18 हजार 466 नवीन कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 75 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 653 इतकी झाली असून 259 जण ओमिक्रॉन मुक्त झाले आहेत.
राज्यात आजपर्यंत 65 लाख 18 हजार 916 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.86 टक्के झाले आहे. राज्यात आज 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 573 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.1 टक्के झाला आहे.
COVID19 | Maharashtra reports 18,466 new cases & 20 deaths today; Active cases 66,308. Omicron case tally reaches 653, of these 259 have been discharged pic.twitter.com/75MjN4N98G
— ANI (@ANI) January 4, 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात आजपर्यंत 6 कोटी 95 लाख 09 हजार 260 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 67 लाख 30 हजार 494 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.68 टक्के आहे. सध्या 66 हजार 308 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 3 लाख 98 हजार 391 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 1110 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.
मागील 10 दिवसांतील रुग्ण वाढ
25 डिसेंबर – 1485 रुग्ण
26 डिसेंबर – 1648 रुग्ण
27 डिसेंबर – 1426 रुग्ण
28 डिसेंबर – 2172 रुग्ण
29 डिसेंबर – 3900 रुग्ण
30 डिसेंबर – 5368 रुग्ण
31 डिसेंबर – 8067 रुग्ण
1 जानेवारी – 9170 रुग्ण
2 जानेवारी – 11,877 रुग्ण
3 जानेवारी – 12, 160 रुग्ण
आज (4 जानेवारी) – 18,466 रुग्ण
Web Title :- Coronavirus in Maharashtra | Worrying! Big increase in corona patients in the state! 18,466 new patients in last 24 hours, find out other statistics