पुणे : बहुजननामा ऑनलाइन – जिल्ह्यातील शासकीय (Government), निमशासकीय (Semi-Government), खाजगी (Private)अशा सर्व आस्थापनांमध्ये कोरोना लशीचे दोन डोस (Vaccine) न घेणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. विधान भवन येथे कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी या मोठ्या निर्णयाची घोषणा केली.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, नव्या प्रकारच्या कोविड विषाणूचा धोका टाळण्यासाठी लसीकरण (Vaccination) वाढविणे नितांत गरजेचे आहे. नागरिकांना लसीकरणासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात आले आहे. तरीदेखील बऱ्याच नागरिकांनी लशीचा दुसरा डोस घेतली नसल्याने जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि खाजगी अशा सर्वच आस्थापनांमध्ये ‘दोन डोस नाही तर प्रवेश नाही’ या नियमाचे बंधन घालण्यात येत आहे. उपहारगृहे, मॉल्स, दुकाने, सिनेमागृहे, नाट्यगृहे तसेच इतर आस्थापना चालकांनी लशीच्या दोन डोस शिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये असे निर्देश पवार यांनी दिले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne), जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे (Nirmala Pansare), महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol), खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat), वंदना चव्हाण (Vandana Chavan), विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao), जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) आदी उपस्थित होते.
Web Title :- Ajit Pawar | ‘No vaccine, no admission’, Ajit Pawar’s big decision in Pune
Chandrakant Patil | ‘शरद पवार तेव्हा म्हणाले होते मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला काय? आता…’
Maharashtra Police | राज्यातील 4000 पोलिसांनी ईमेलद्वारे केली ठाकरे सरकारकडे ‘ही’ मागणी
Hot Food Side Effects | तुम्ही देखील हिवाळ्यात गरम अन्न खाता? शरीराचं होतं मोठं नुकसान, जाणून घ्या