पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज (मंगळवार) पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज शहरामध्ये हजाराच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona) 1104 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 151 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 12 हजार 689 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 144 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 119 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 3790 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 89 रुग्ण गंभीर आहेत. तर 76 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6819 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 38 लाख 92 हजार 879 तपासणी करण्यात आल्या आहेत.
Web Title : Pune Corona | Extremely worrying! More than 1100 new corona patients were found in Pune in the last 24 hours, find out other statistics
Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार