मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या घटली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 248 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 121 ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णाची नोंद झाली आहे.
राज्यात आज 18 हजार 942 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 76 लाख 12 हजार 233 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.22 टक्के झाले आहे. राज्यात आज 45 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.83 टक्के झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात आजपर्यंत 7 कोटी 60 लाख 40 हजार 567 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 29 हजार 633 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 70 हजार 150 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 5 लाख 53 हजार 175 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 2386 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 6248 new patients in state in last 24 hours find out other statistics