पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांची वाढलेली संख्या कमी होताना पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. आज पुणे शहरामध्ये 6821 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 868 जणांचा कोरोनाचा (Pune Corona Update) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचवेळी 2 हजार 141 रुग्ण बरे झाले आहेत.
शहरात आजपर्यंत 44 लाख 17 हजार 522 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 55 हजार 296 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 36 हजार 984 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 07 तर हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 324 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 8 हजार 988 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 209 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive ventilator) वर 38 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive ventilator) 18 रुग्ण आहेत. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 7.67 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
Web Title :- Pune Corona Update | Discharge of 2141 corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics
Pune Crime | दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त
EPFO | पीएफमधून 1 तासात तुमच्या बँक खात्यात येतील पैसे; जाणून घ्या अॅडव्हान्स घेण्याची पद्धत