मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Coronavirus in Maharashtra |राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (शुक्रवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या (Coronavirus in Maharashtra) आटोक्यात आल्याचे दिसत असताना दुसरीकडे मृत्यूंचा (Death) आकडा कमी जास्त होत असल्याने राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
https://twitter.com/PIBMumbai/status/1428711461686157317?s=20
राज्यात आज 4,365 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6, 384 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 62 लाख 21 हजार 305 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 96.97 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 105 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.11 टक्के इतका झाला आहे.
सध्या राज्यात 55 हजार 454 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत 1 लाख 35 हजार 672 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 19 लाख 21 हजार 798 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 15 हजार 935 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 3 लाख 22 हजार 221 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 2,745 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Web Title : Coronavirus in Maharashtra | Comfortable 6,384 corona free in the last 24 hours in the state find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update